स्पर्धा परिक्षेसाठी अद्ययावत दालन उभे करणार : चितळे उद्योग समुहाचे उद्योजक गिरीश चितळे
भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय येथे वाचक-सभासद मेळावा उत्साहात ; अनेकांचा सन्मान

दर्पण न्यूज भिलवडी:
वाचन चळवळ आपल्या भिलवडी परिसरात आहेच. समृद्धीकडे जाण्यासाठी वाचनाचा सर्वांनी संकल्प करावा. भिलवडी आणि परिसरातील मुलांसाठी स्पर्धा परिक्षेसाठी अद्ययावत दालन उभे करणार, असे आश्वासन चितळे उद्योग समुहाचे उद्योजक व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी केले.
भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयात ते वाचक-सभासद मेळाव्यात ते बोलत होते. वाचनालयाचे उपाध्यक्ष डी.आर.कदम, कार्यवाह सुभाष कवडे, जी.जी.पाटील, भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
गिरीश चितळे म्हणाले,
ग्रंथाचा तसेच पुस्तकाचा वापर सर्वांनी करावा. पुढच्या दोन वर्षात चांगली अभ्यासिका बनवणार आहोत.
सुसज्ज जागा होईल. मुलांनी अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेत चमकावे हा उद्देश वाचनालयाचा आहे. सर्वांना आरोग्य, ऐश्वर्य लाभो म्हणत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या
नयना अविनाश यादव यांनी वाचनालयाला २५
पुस्तके भेट दिली.यावेळी अनेकांचा सन्मान करण्यात आला.
डॉ.सुहास जोशी, डी.आर.कदम, नयना यादव, रोहित रोकडे, पुरूषोत्तम जोशी, अभिषेक साळुंखे, अभिजीत रांजणे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन सुभाष कवडे तर आभार हणमंत डिसले यांनी मानले.