सांगली : कर्नाळा येथील काँग्रेस पदाधिकारी, अनेक कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षांमध्ये जाहीर प्रवेश ; प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांची उपस्थिती
कर्नाळ मध्ये नवी सांगली वसवण्याचा विचार केला पाहिजे ; जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम

दर्पण न्यूज मिरज : आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे. प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांची जिल्ह्यातील धडाकेबाज कामगिरी मुळे इतर पक्षांतील असंख्य नेते पदाधिकारी हे जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत. आज
सांगली जिल्ह्यातील कर्नाळ गावाचे माजी उपसरपंच आणि काँगेस पक्षाचे माजी पदाधिकारी नासीर चौगुले यांच्यासह समीर मुल्ला, पोपट मंगसुळे, रघुनंदन उर्फ नाना घोरपडे, किरण कदम ,सागर मोहिते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांन जनसुराज्य शक्ती पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करून त्यांना गावाच्या विकासाच्या दृष्टीने लागणारी सर्व मदत करण्याचे अभिवचन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव अण्णा कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे, शहराध्यक्ष डॉ पंकज म्हेत्रे, जिल्हा संघटक सलीम पठाण, ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला, सुशांत काळे, अल्ताफ रोहिले जयसिंग चव्हाण, अरविंद पाटील यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते,सांगली ग्रामीण मधील कर्नाळ गाव भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असून येथे नवी सांगली बसवण्याच्या विचार सर्वांनी केला पाहिजे ,सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन यावेळी समीत दादा कदम यांनी दिली.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.