सोलापूरची भाकरी गुजरातच्या खाकर्याला स्पर्धा म्हणून उभी करायची आहे : कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर,
रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात

दर्पण न्यूज पलूस :- ग्लोबल वॉर्मिग थांबवण्यासाठी आपला भारत देश मोठे योगदान देवू शकतो. कारण आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात पिकाऊ जमीन आहे. यामध्ये दरवर्षी एकतरी झाड लावा आणि त्याचे जतन करा. वृक्षमित्र व्हा. कारण वृक्षदुत हेच आपल्या देशाला संपन्न बनवतील. आमच्या सोलापूरची भाकरी प्रसिद्ध आहे. जी तीन महिने टिकत असल्याने त्यावर प्रक्रिया करून घरगुती भाकरी सारखी मऊ कशी बनवता येईल व आपल्या सैनिकांना पुरवता याबाबत येईल याबाबत संशोधन सुरु आहे. सोलापूरची भाकरी गुजरातच्या खाकर्याला स्पर्धा म्हणून उभी करायची आहे.
असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले.
रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर बोलत होते.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड होते.
त्यांनी अभ्यासाबरोबर खेळायला महत्व दिले गेले पाहिजे ,व्यक्ती नुसता हुशार असून चालणार नाही तर शारीरिक दृष्ट्या ही सुदृढ असला पाहिजे असे सांगितले .आयुष्यात एक तरी खेळ खेळत राहिले पाहिजे असे लाड यांनी सांगितले .
यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे.के जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली .
त्यांनी रामानंदनगर महाविद्यालयाने सर्व स्टाफने NAAC पुनर्मूल्यांकनांमध्ये अथक परिश्रम करून ए डबल प्लस मानांकन मिळाल्याबद्दल कौतुक केले .
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्राचार्य प्रो. डॉ.यू व्ही.पाटील यांनी केले .
कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष उपप्राचार्य डॉ.के.बी भोसले यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन तर जिमखाना अहवाल वाचन लेफ्टनंट संदेश दौंडे यांनी केले.
या कार्यक्रमा वेळी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय याची माहिती पुस्तके चे प्रकाशन करण्यात आले व प्रा . अनिता ममलिया यांनी यांनी लिहिलेल्या वनस्पती जीवशास्त्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा अमोल जमदाडे यांनी पारितोषिक जिमखानाचे वाचन केले शैक्षणिक पारितोषिक वाचन प्रा .ए. बी .मडावी, गुणवंत प्राध्यापकांच्या यादीचे वाचन सुशेन कांबळे यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.गौरी पाटील यांनी केला .
शुभ संदेश वाचन डॉ.आर. आर. सोनावले यांनी केले.
महाविद्यालया मध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्रीय,
स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कला,क्रीडा, शैक्षणिक प्राविण्य मिळवलेल्या सर्वांचा गुणगौरव करण्यात आला .
राष्ट्रीय खेळाडू अंजली पवार, साक्षी येताळे ,मृणाली जाधव, दीक्षा शिंदे ,शर्वरी नाईक ,पार्थ नलावडे, निवास उगळे, प्रज्वल पाटील यांना महाविद्यालयाने रोख मानधन, बक्षिसे ,ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नम्रता कांबळे, प्रा .संजीवनी शिंदे यांनी केले.