कृषी व व्यापारमहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावा : कृषी सहाय्यक संतोष चव्हाण

 

 

 

दर्पण न्यूज पलूस :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचेमार्फत अंकलखोप, नागठाणे, राडेवाडी सूर्यगाव येथील खातेदार शेतकरी यांना आवाहन करण्यात येते की दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत आपल्या सातबारावर जेवढी नावे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावातील किंवा नजीकच्या गावातील सीएससी केंद्रावर संपर्क करून आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावा असे आवाहन कृषी सहाय्यक संतोष चव्हाण यांनी केले आहे.
*फार्मर आयडी म्हणजे काय?*
फार्मर आयडी म्हणजे ॲग्रीस्टॅक प्रणाली द्वारे तयार करण्यात येणारा शेतकऱ्यांचा अद्वितीय ओळख क्रमांक होय. या आयडीवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि जमिनीचा सातबारा इत्यादी माहिती समाविष्ट असते. या आयडीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक कामामध्ये तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मदत होते.
*फार्मर आयडी का बनवावी?*
ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीची ओळख म्हणजे आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे शेतकरी असल्याचे ओळख म्हणजे फार्मर आयडी राहणार आहे त्यामुळे सातबाराशी संबंधित सर्व लाभ करता फार्मर आयडी अत्यावश्यक होणार आहे.
*फार्मर आयडी न बनविल्यास*
पी एम किसान योजनेचा लाभ बंद होईल.
नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद होईल.
पिक विमा निघणार नाही.
पीक कर्ज मिळणार नाही.
कृषी विषयक कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई मिळणार नाही.
जमीन खरेदी-विक्री व्यवहार करता येणार नाही.
कर्जमाफी योजनेचा लाभ घेता येणार नाही.
*फार्मर आयडी तयार करण्यासाठी सातबारा किंवा आठ अ उतारा, आधार लिंक मोबाईल नंबरची आवश्यकता आहे.*
स्मार्ट शेतकरी स्मार्ट शेती
ॲग्रीस्टॅक सोबत प्रगतीची गती
हेल्पलाइन क्रमांक -020 – 25712712 वर संपर्क करावा असे आवाहन कृषी सहाय्यक संतोष चव्हाण यांनी केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!