महाराष्ट्र
येडशी येथे सुभेदार गणेश गायकवाड यांचे होणार जंगी स्वागत

दर्पण न्यूज येडशी प्रतिनिधी संतोष खुणे :- धाराशिव तालुक्यातील येडशी गावचे सुपुत्र गणेश पांडुरंग गायकवाड हे भारतीय सैन्य दलातुन सुभेदार या पदावरून आपली 28 वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून निवृत्त होणार आहेत, तसेच ते आपल्या मूळ गावी आज सायंकाळी चार वाजता परत येणार आहेत. येडशी बस स्टॅन्ड ते बौद्ध नगर अशी त्यांची शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे . सर्व बौद्ध बांधव मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे . त्यांच्या स्वागत कार्यक्रमाची कार्यक्रमाला उपस्थित राहावेळ असे आव्हान उमेश गायकवाड यांनी केले आहे.