कृषी व व्यापारमहाराष्ट्र
वसगडे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस येथील कृषी अधिकारी यांनी केली सोयाबीन पीक पाहणी


वसगडे : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील वसगडे येथे
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस येथील कृषी अधिकारी अरविंद यमगर यांनी सोयाबीन पीक पाहणी केली.यावेळी श्री अरविंद यमगर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील पाने खाणारी अळी केसाळ अळी खोडकीड यांचे पासून प्रादुर्भाव झालेल्या पिकाचे निरीक्षण कसे करावे व त्याची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्याच्या पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोयाबीन पिकावरील कीड व रोगाच्या नियंत्रणाबाबत श्री संतोष चव्हाण कृषी सहाय्यक यांनी सखोल माहिती दिली. त्याचबरोबर कृषी सहाय्यक पूनम जाधव यांनी सततच्या पावसाने होणारे नुकसान टाळण्यासाठी अतिरिक्त पाणी शेतातून बाहेर काढणे व विद्राव्य खताचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी वसगडे येथील सुशांत कोळी प्रवीण पाटील व अन्य शेतकरी उपस्थित होते.


