कोल्हापूरचा राज्य कर अधिकारी निवास श्रीपती पाटील याला 25 हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्
कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांचे ऑइल व ग्रीस रिपॅकिंग करण्याची कंपनी आहे.आरोपी निवास श्रीपती पाटील यांनी तक्रारदार यांना कंपनीची कागदपत्रे जीएसटी विभागाचे नियमाप्रमाणे आहेत का याबाबत नोटीस पाठवली होती. दरम्यान मुदतीत आरोपी निवास पाटील यांनी तक्रारदार यांची कंपनीस भेट देऊन त्यांचे कंपनीचा बँकेचा अकाउंट नंबर जीएसटी पोर्टलला नोंदवला नाही म्हणुन तक्रारदार यांना दीड ते दोन लाख रुपये दंड होईल असे सांगून दंड नको असेल तर 25,000/- रुपये द्यावे लागतील असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे 25000/-₹ लाचेची मागणी केली त्यानंतर आरोपी निवास श्रीपती पाटील वय 45 पद— राज्य कर अधिकारी वर्ग 2 नागाळा पार्क ” कोल्हापूर. मूळ गाव कोलोली ता. पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांनी तक्रारदार यांचेकडुन 25,000/-रुपये स्वीकारताना त्यांना लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकङले त्यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील,
यांच्या मार्गदर्शनाखाली आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक
पो.हे.कॉ.अजय चव्हाण,
पो.हे.कॉ.विकास माने,
पो.हे.कॉ. सुनील घोसाळकर,
पो.ना.सुधीर पाटील,
पो.ना.सचिन पाटील,
पो.कॉ.कृष्णा पाटील,
चा.पो.हे.कॉ.कुराडे,पो.कॉ.दावणे
यांच्या पथकाने केली.