पलूस : सांगली जिल्ह्यातील वांगी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भारती विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या सेवकांचा माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते सन्मानसोहळ्या प्रसंगी उपस्थित राहून सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी बांधवांना सदिच्छा दिल्या.
भारती विद्यापीठाच्या आजवरच्या वाटचालीत या सर्वांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. भारती विद्यापीठ हे एक मोठे कुटुंब आहे. आपण या कुटुंबातील एक महत्त्वाचे सदस्य आहोत या नात्याने या सर्वांनी कुटुंबाच्या प्रगतीत उचललेला वाटा नक्कीच मोलाचा आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. सेवानिवृत्त झाले असले तरी या कुटुंबाचा एक अनुभवी हिस्सा म्हणून ते सदैव सोबत राहतील. या सोहळ्यास समवेत मा.आ. मोहनरावदादा कदम, जिल्हा बँकेचे संचालक मा. महेंद्रअप्पा लाड, मा. रामचंद्र कदम, मा. जितेश कदम यांचेसह सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.



