महाराष्ट्र
पत्रकार दत्तात्रय सपकाळ यांना मातृशोक

दर्पण न्यूज पलूस :- दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार दत्तात्रय सपकाळ यांच्या मातोश्री
सौ.शांताबाई महादेव सपकाळ (वय- ७६) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. यशवंतराव चव्हाण सोसायटीचे माजी उपाध्यक्ष महादेव सपकाळ यांच्या त्या पत्नी होत्या तर देवराष्ट्रे ता. कडेगाव येथील दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार दत्तात्रय सपकाळ व दिगंबर सपकाळ यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. देवराष्ट्रे येथे त्यांच्या वरती अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक गावातील ग्रामस्थ माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांता काकींचे माहेर निमसोड तालुका खटाव हे होते. रक्षाविसर्जन बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:00 वाजता देवराष्ट्रे येथे होणार आहे.