इंग्लिश मीडियम, प्रायमरी अँड हायस्कूल,भिलवडी येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील इंग्लिश मीडियम, प्रायमरी अँड हायस्कूल,भिलवडी मध्ये मकर संक्रांती निमित्त शनिवार दिनांक १८/०१/२५ रोजी *माता पालकांसाठी हळदीकुंकू* समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
हळदी कुंकू समारंभाची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. आपल्या शाळेमध्ये हा समारंभ एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्व मातापालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. मार्गदर्शक म्हणून . *डॉ. सौ. अरूंधती अभिजीत पाटील* व *पोलिस कॉन्स्टेबल सौ.शितल राहूल माने, व अध्यक्षस्थानी सौ.सुवर्णा रमेश पाटील* यांना आमंत्रित केले होते.
त्यांनी ” **मुलांना घडविताना पालकांचे कर्तव्य व मोबाईल ॲप वापरताना घ्यावयाची काळजी * – या* विषयावर खूप* सुंदर शब्दांमध्ये माता पालकांना मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानामध्ये मुलांच्या आरोग्य विषयक विविध गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्या. आई व मुलांमधील नातेसंबंध, आईची जबाबदारी, संस्कार अशा वेगवेगळ्या विषयांवर माता पालकांशी साधला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माता पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माता पालकांना हळदीकुंकू व तिळगुळ देऊन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी लीना चितळे,सेकंडरी स्कूल ॲण्ड ज्यूनिअर कॉलेजच्या सौ .मनिषा पाटील मॅडम,बालवाडी विभागाचे मुख्याध्यापिका सौ.सुचेता कुलकर्णी मॅडम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कु .विद्या टोणपे व सौ.स्मिता माने तसेच के.जी व प्रायमरी विभागातील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मीनाक्षी चौगुले,स्वागत सौ. मनीषा बाबर पाहुण्यांचा परिचय सौ.किर्ती चोपडे यांनी करुन दिला तर आभार सौ. सुप्रिया पवार यांनी मानले.