महाराष्ट्र
येडशी येथे महामानवांची विटंबना करणार्या राहूल सोलापूरकर याच्या निषेधार्थ आंदोलन

दर्पण न्यूज (संतोष खुने, येडशी उस्मानाबाद) :-
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी द्वेषाने व अपमानास्पद सोशल मीडियावर वक्तव्य करून महामानवाची विटंबना करणार्या राहूल सोलापूरकर याच्या निषेधार्थ आज येडशी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी अनिल हजारे सतपाल बनसोडे ,धम्मपाल गायकवाड, पवन बचुटे ,संजित मस्के बंधू आयू सावंत सुरज वाघमारे प्रमोद ताटे, सतिश ओव्हाळ व इतर शेकडो कार्यकर्त्यांनी राहुल सोलापूरकर याच्या निषेधार्थ घोषणा देत संबंधितांना तात्काळ अटक करण्यात यावी, असे मा मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे