पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा

कोल्हापूर, ः अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दिनांक 26 जून 2025 रोजी सकाळी 7.10 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, येथून शासकीय वाहनाने विश्रामगृह, कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी 7.20 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 8 वाजता लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आगमन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज 151 वी जयंती निमित्त शाहू जन्मस्थळ अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 8.30 वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथे आगमन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज 151 वी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने समता दिंडीचे आयोजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशिक्षीत आपदा मित्र स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित किट वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025-26 प्रदान कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आगमन व राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने शाहू जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस, संस्थेस राजर्षी शाहू पुरस्कार 2025 कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार गारगोटी, ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.