क्रीडामहाराष्ट्र

इचलकरंजीत शनिवारी आकरा वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

 

कोल्हापूरः अनिल पाटील

चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या सहकार्याने चेस असोसिएशन इचलकरंजीने शनिवार दिनांक सात जून रोजी अकरा वर्षाखालील मुला-मुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे. माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार, उद्योजक प्रमोद सोनी सर व विशाल जी कांबळे साहेब यांचे या स्पर्धेस विशेष सहकार्य लाभले आहे.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी,दाते मळा, इचलकरंजी येथे या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहेत.शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. मुले आणि मुलींची स्वतंत्र गटात स्पर्धा होणार आहे. १/१/ २०१४ ला किंवा त्यानंतर जन्मलेल्या फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील मुलां-मुलींना या निवड स्पर्धेत भाग घेता येईल.
या निवड बुद्धिबळ स्पर्धेतून दोन मुले व दोन मुलींची निवड १३ ते १५ जून दरम्यान पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात करण्यात येणार आहे.
दोन्ही स्पर्धेतील मुले व मुलींच्या गटात विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे रु.१०००/-, रु. ५००/- व रु.५००/- रोख व चषक चे बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त १२ चषक व २२ मेडल्स स्वरूपात उत्तेजनार्थ बक्षीसे ठेवली आहेत.
याशिवाय निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये व स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येकास टी शर्ट संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येकी दोनशे रुपये प्रवेश शुल्क ठेवले आहे.तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी शुक्रवार दि. सहा जून रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नावे खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.
1) विजय सलगर :- 9130743111
2) रवींद्र निकम :- 9371460068
3) रोहित पोळ – 9657333926
4) करण परीट :-9561498385
5) श्री. मनिष मारुलकर – 9922965173

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!