महाराष्ट्र
भारती बझार शाखा भिलवडीचा 3 रोजी हळदी कुंकू समारंभ

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे भारती बझार शाखा भिलवडी च्यावतीने सोमवार दिनांक 3 रोजी सायंकाळी 5 वाजता प्राथमिक मराठी भिलवडी येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास विजयमाला पतंगराव कदम, भारती महेंद्र लाड, स्वप्नालीताई विश्वजीत कदम उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.