कुपवाड येथील शिक्षक अमोल माने यांचा के. सी. ठाकरे समाजभूषण पुरस्काराने सन्मान

दर्पण न्यूज कुपवाड :
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली यांच्या कडून शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी बद्दल प्रबोधनकार के. सी. ठाकरे समाज गौरव पुरस्कार २०२५ या पुरस्काराने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगली चे जिल्हाध्यक्ष, शिक्षक बँकेचे संचालक, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा सचिव अमोल माने यांचा सन्मान करून जन मित्र पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले.शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांप्रती केलेले उल्लेखनीय काम तसेच शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यातील योगदान व ते करत असलेले सामाजिक कार्य या त्यांच्या सर्व कार्याचा विचार करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अमोल माने हे सध्या जिल्हा परिषद शाळा बोलवाड येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना यापूर्वी पलूस मधील सुखवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, पंचायत समिती पलूस चा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद सांगलीचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद सांगली चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार यासह अनेक सेवाभावी संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले असून प्रबोधनकार के. सी. ठाकरे समाज गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल जिल्ह्यातील तमाम शिक्षकांचे कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजयभैय्या सोनवणे, विधानपरिषद सदस्य आमदार इद्रिसभाई नाईकवडी, जनसुराज्य पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, आर. पी. आय. युवक सांगली जिल्हाध्यक्ष स्वेतपद्म कांबळे, माजी नगरसेवक गणेश माळी,महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे,सातारा जिल्हाध्यक्ष किरण बागडे,सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव, प्रा. विजयकुमार कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.