ग्रामीण भागातील समस्या बाबत मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा करणार : प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम
मिरज पूर्व भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला खिंडार : अनेक पदाधिकाऱ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश ,

दर्पण न्यूज मिरज ; (अभिजीत रांजणे)
सोनी तसेच मिरज पूर्व भागातील काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आज प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अधीकृत पक्षप्रवेश घेण्यात आला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका समोर ठेऊन जनसुराज्य शक्ती पक्षाने ग्रामीण भागामध्ये जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच इतर पक्षांतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षाच्या संपर्कात असून एक मोठा गट आज जनसुराज्य पक्षात प्रवेश केला या पक्ष प्रवेशाने मिरज पूर्व भागातील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे सोनी ग्रामपंचायत सदस्य
अरविंद पाटील द्राक्ष बागायतदार संघ संचालक जयसिंग तात्या चव्हाण, करोली एम सामाजिक कार्यकर्ते
माणिक तोडकर ,काकडवाडीचे संजय पाटील, चाबुकस्वरवाडीचे विश्वजीत काळे
आरिफ मलिदवाले मिरज तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शब्बीर मुल्ला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश करून सुमित दादा कदम यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास दिला यावेळी माजी नगराध्यक्ष
डॉ महादेव अण्णा कुरणे
जनसुराज्यशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख
आनंदसागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष
डॉ पंकज म्हेत्रे ,जिल्हा उपप्रमुख चेतन कलकुटगी योगेश दरवंदर ,शहर अध्यक्ष
विनायक रुईकर, जितेंद्र धोंड, विनायक शरबंदे हे उपस्थित होते