ग्रामीणमहाराष्ट्र
पळसप येथील हजरत सिद्दीक जाउद्दीन बाबा यांच्या उरुस निमित्त शिवसेना तालुकाप्रमुख लाकाळ यांच्या हस्ते दर्ग्यास चादर चढवली

दर्पण न्यूज धाराशिव ( संतोष खुणे ) – ; धाराशिव तालुक्यातील पळसप येथील हजरत सिद्दीक जाउद्दीन बाबा यांचा ऊरुस सुरु झाला आहे. या निमित्त सर्व धर्मियांच्यावतीने विविध कार्यक्रम साजरे केले जातात.हा उरुस साजरा करण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या निमित्त शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांच्या हस्ते हजरत सिद्दिक जाऊ दिल बाबा यांच्या दर्गावर चादर चढवण्यात आली. यावेळी उर्स उत्सव कमिटीचे अध्यक्ष सरताज पटेल, मामु सत्तार, संतोष मगर, मनोज लाकाळ, जीवन चौधरी, अमर सुरवसे, मुस्तफा शेख, हैदर पठाण, तोफिक शेख, उस्मान शेख, खमर पठाण, शौकत तांबोळी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.