





भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी भुवनेश्वरवाडी येथील भुवनेश्वरी देवीचे दर्शन खासदार संजय काका पाटील यांनी मनोभावे घेतले. काका यांनी यानंतर माजी सरपंच शहाजी भाऊ गुरव, माजी जिल्हा परिषद सदस्या भारती गुरव यांच्या घरी भेट घेतली. तसेच भाऊ यांच्या आईंच्या तब्येतीची विचारपूस केली.
यावेळी शहाजी भाऊ गुरव यांनी खासदार संजय काका पाटील यांचा सत्कार, सन्मान केला. यावेळी भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर, नितीन नवले, भाजपचे दत्ता उथळे, आदी मान्यवर उपस्थित होते.