सण-उत्सव पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सांगली जिल्ह्यासह भिलवडीत पथसंचलन

दर्पण न्यूज सांगली : सांगली जिल्ह्यात दिनांक 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत हिंदू धर्मियांचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. तसेच 5 सप्टेंबर 2025 रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद-ए-मिलाद (महंमद पैगंबर जयंती) हा सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सांगली जिल्हा पोलिसांकडून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पथ संचलन करण्यात आले. भिलवडी येथील पथसंचलन करण्यात आले.
विटा पोलीस ठाणेस १ पोलीस उप-अधीक्षक, १ पोलीस निरीक्षक, ३ सपोनि /पोऊनि, २४ पोलीस अंमलदार, एसआरपीएफ कडील १ अधिकारी १९ अंमलदार यांचेसह विटा शहरातील छ. शिवाजी महाराज चौक-तासगाव रोड – मुल्ला गल्ली – पाणी टाकी – क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा-मायणी रोड- वनपरिक्षेत्र कार्यालय-चौगुले प्रशाला- चौंडेश्वरी चौक- सावरकरनगर- पोलीस ठाणे असे पथ संचलन करण्यात आले.
भिलवडी पोलीस ठाणेस १ सहा. पोलीस निरीक्षक, १८ पोलीस अंमलदार, १६ होमगार्ड यांचेसह भिलवडी शहरातून मेन रोड-बाजारपेठ – भोई गल्ली-मेन रोड – बाहेरील गल्ली – ऐतवडे चौक- पंचशीलनगर- महादेव मंदिर-मधली गल्ली असे पथ संचलन करण्यात आले.
कासेगाव पोलीस ठाणेस १ सहा. पोलीस निरीक्षक, २ पोऊनि, ११ पोलीस अंमलदार, ९ होमगार्ड यांचेसह कासेगाव व नेर्ले या गावातील प्रमुख मार्ग असे पथ संचलन करण्यात आले.
कुंडल पोलीस ठाणेस १ सहा. पोलीस निरीक्षक, १७ पोलीस अंमलदार, २० होमगार्ड यांचेसह कुंडल गावीतील ग्रामपंचायत चौक- मारूती मंदिर – मुख्य बाजारपेठ- गणेश मंदिर – भवानी मंदिर – हळबाग मार्ग व पुणदी गावातील ग्रामपंचायत चौक- मारूती मंदिर – मुख्य बाजारपेठ असे पथ संचलन करण्यात आले.
पलूस पोलीस ठाणेस १ पोलीस निरीक्षक, २० पोलीस अंमलदार, २० होमगार्ड यांचेसह पलूस शहरातील नवीन बस स्टॅण्ड-पलूस चौक – मुख्य बाजारपेठ – फॅशन कॉर्नर-गांधी चौक- कुंडल वेस-रामानंदनगर- छ.शिवाजी महाराज चौक – भगतसिंग चौक – मुख्य बाजारपेठ असे पथ संचलन करण्यात आले.
सांगली ग्रामीण पोलीस ठाणेस १ पोलीस उप-अधीक्षक, ४० पोलीस अंमलदार, १२ होमगार्ड, एसआरपीएफ कडील १ प्लाटून यांचेसह नांद्रे व बुधगाव गावातील प्रमुख मार्गाने असे पथ संचलन करण्यात आले.