डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रचाराला खेराडी वांगी आणि शिवणी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ विश्वजीत कदम यांचे अनेक ठिकाणी जंगी स्वागत

कडेगांव: -पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रचाराला खेराडी वांगी आणि शिवणी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन्ही गावांमध्ये ग्रामस्थ, माता-भगिनी व कार्यकर्त्यांनी फुलांच्या वर्षावात जोरदार स्वागत केले.
यावेळी डॉ विश्वजीत कदम म्हणाले की, आपल्या भागातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावू, . आपले प्रेम व विश्वास निरंतर कायम ठेवून पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास जितीने करू, येत्या २० नोव्हेंबरला ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने मला विजयी करा असे आवाहन डॉ विश्वजीत कदम यांनी केले .
डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की,महाविकास आघाडीने जाहीर केलेली लोकसेवेची पंचसूत्री आणि जाहीरनामा म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या सर्वांगीण विकासाची पूर्ण गॅरंटी आहे. महिला, शेतकरी, युवक अशा समाजातील प्रत्येक घटकाच्या तसेच शिक्षण, आरोग्य, उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष योजना राबविण्याचा संकल्प महाविकास आघाडीने केला आहे. ही विधानसभा निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. सत्तेच्या लोभापायी आपला महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधून जनतेचे वाटोळे करणाऱ्या भाजप व महायुतीला पराभूत करून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी व सर्वांगीण प्रगतीसाठी काँग्रेस व महाविकास आघाडीला भक्कम साथ द्या. मी महापूर कोरोना काळात जीवाची पर्वा न लोकांची सेवा केली. मतदारसंघातील लोकांचा विकास करणे माझे ध्येय आहे.
यावेळी काँग्रेसचे युवा नेते सतीश आबा पाटील यांनी सांगितले की, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास स्व पतंगराव कदम साहेब यांनी केला. यांचा विचार घेऊन आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सर्वांच्या हिताचा विचार करून मतदारसंघाचा विकास केला आहे, हा आपण कधीही न विसरणारी आहे. त्यामुळे विरोधाकाच्या भूलथापांना बळी पडू नका. 20 नोव्हेंबर रोजी च्या मतदानावेळी आपण हाताच्या पंजा समोरील बटन दाबून डॉक्टर विश्वजीत कदम यांना निवडून द्या., असे आवाहन ही पाटील यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांतारामबापू कदम, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.