महाराष्ट्र
प्रजासत्ताक दिनासाठी रूपाली अंकुशराव यांचा दिल्लीत असणार सहभाग

दर्पण न्यूज धाराशिव (प्रतिनिधी) -; तालुक्यातील कौडगाव (बा) येथील अंगणवाडी कार्यकर्ते रूपाली नितीन अंकुशराव यांची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी निवड झाली असून त्या दि.२६ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
धाराशिव तालुक्यातील कौडगाव (बा) येथील अंगणवाडी क्रमांक ११८ मधील अंगणवाडी कार्यकर्ती रूपाली अंकुशराव यांची एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प या कार्यालयातून निवड झाल्या असून त्या जिल्ह्यातून एकमेव आहेत. या निवडीबद्दल बाल विकास प्रकल्प अधिकारी सविता देशमुख, विस्तार अधिकारी किशोर वंजारवाडकर, सुपरवायझर वंदना सुकाळे, कनिष्ठ सहाय्यक ययाखान पठाण आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.