क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंमुळे अनिष्ठ रूढी परंपरा मोडीत निघाल्या आणि महिलांचा उद्धार झाला : रश्मीताई भंडारे
हौसाई वृद्धाश्रमात सावित्रीमाई फुले जयंती निमित्त महिला सन्मान फेरीचे आयोजन



दर्पण न्यूज मिरज/सांगली प्रतिनिधी :-
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंमुळे अनिष्ठ रूढीपरंपरा मोडीत निघाल्या आणि महिलांचा उद्धार झाला असून आज त्यांच्या कार्यामुळे स्त्रियांना समानतेचा अधिकार मिळाला असल्याचे मत हौसाई वृद्धाश्रमाच्या संस्थापक सचिव सौ. रश्मीताई भंडारे यांनी व्यक्त केले.
हौसाई वृद्धाश्रमात सावित्रीमाई फुलेंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, लहान मुलींच्या वस्ताद लेझीम पथकाच्या सह महिला सन्मान फेरीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अंधश्रद्धा निर्मुलनच्या माजी नगरसेविका ज्योती आदाटे, भारती न्यू लॉ महाविध्यालयाच्या बेबीआयेशा इनामदार, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी वर्षा पाटील,राजमाता महिला डी एड कॉलेजच्या अमृता दीक्षित आदी उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे होते.
हौसाई वृद्धाश्रम व तथास्तु कल्चरल अकॅडेमी यांच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी सौ. रश्मीताई भंडारे पुढे म्हणाल्या,” स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात करून त्यांनी नव्या युगाची सुरुवात केली त्यांच्या त्यागामुळे आज महिला सरपंच, शिक्षक, डॉक्टर, वकील आमदारच नव्हे तर देशाच्या राष्ट्रपती पदी आरूढ झाल्या, विधवा महिला प्रधान मंत्री बनू शकल्या सहकार्य, राजमाता जिजाऊ आणि सावित्रीमाई यांचे विचार तळागाळात रुजावेत यासाठी प्रयत्न करू’’
स्वागत प्रास्ताविक ऋतुजा कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन विजय लांडगे यांनी केले.
यावेळी शिक्षणाचे महत्व, महिलावरील अत्याचार, नशामुक्ती व्हावी, स्त्री भ्रून हत्या सारख्या सामजिक प्रबोधनासाठी भव्य महिला सन्मान फेरी काढण्यात आली, यामध्ये हौसाई वृद्धाश्रमातील महिलांच्या सह विध्यार्थिनी सहभागी झाल्या, रांगोळी स्पर्धा, व अन्य उपक्रमासह उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, अंधश्रद्धा निर्मुलनच्या माजी नगरसेविका ज्योती आदाटे, वृद्धाश्रमाचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे, दीक्षा पवार, जितेंद्र पवार, शाहीर चंद्रकांत गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी संचालक हरिदास खबाले, रील स्टार दर्शन पवार, वस्ताद लेझीम पथकाचे नितीन आवळे, अॅड. शिवाजीराव कांबळे, अजय पवार, शकुंतला कांबळे, जयवंत माळी, धनराज जाधव, महेंद्र गाडे, चंदन बनसोडे, रेखाताई शेंडे, सुमनताई वाघमारे, माजी उपसरपंच निर्मलाताई पवार,पत्रकार प्रशांत सावंत, मोनिका पाटील, आदी मान्यवरासह विविध संस्थांचे पदाधिकारी संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अधीक्षक रेखा माळी यांनी मानले.



