वसगडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमशासन भीम गीतांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद ; जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची उपस्थिती

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी ( मारूती डी कांबळे) वसगडे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त वसगडे येथे भीमशासन भीम गीतांचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
दि.23 आज महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त वसगडे येथे भिमशासन भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थितांना संवाद साधतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या संघर्षमय प्रवास सांगितला. या प्रसंगी महापुरुषांच्या इतिहासावर उजाळा टाकला. महापुरुषांची शिकवण, देशासाठी घेतलेले परिश्रम, आणि परिश्रमातून घडवून आणलेल्या अमोलाग्र बद्दल घडवुन आणला याची माहिती दिली.
या वेळी उपस्थित लोकांना नेमकीच झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे , युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे , कार्यक्रमाचे नियोजन जयंती कमिटीचे वसगडे अध्यक्ष प्रकाश कांबळे , उपाध्यक्ष सुभाष कांबळे, गौतम कांबळे ,सुशांत कामत, गजानन कांबळे ,विकास कांबळे, शितल कांबळे, रिपब्लिक पक्षाचे युवा नेते गजेंद्र कांबळे ,निशिकांत कांबळे ,सुंदर कांबळे ,अर्जुन कांबळे, आकाश कांबळे ,किशोर फाळके, तेजस बागडी, आनंद कांबळे तसेच मोठ्या संख्येने भीम अनुयायी यांची उपस्थिती होती.