कोल्हापूरातील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये क्रीङा महोत्सवाअंतर्गत फुटबाॅल स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर ःअनिल पाटील
महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोल्हापूर क्रीडा महोत्सव अंतर्गत फुटबॉल स्पर्धा नूकत्याच संपन्न झाल्या
गेली आठ दिवस महाराष्ट्र स्कूलच्या मैदानावर वर्गवार अंतर्गत फुटबॉल स्पर्धा पार पडल्या इयत्ता पाचवी ते अकरावी पर्यंत ह्या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.
स्पर्धेचे अंतिम सामन्या च्या वेळी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेचे संचालक श्री विनय पाटील, आजीव सेवक उदय पाटील,मुख्याध्यापक एस एन इनामदार,उपप्राचार्य यु आर आतकिरे, उपमुख्याध्यापक एस एस मोरे, पर्यवेक्षक एस ए जाधव, एस व्ही शिंदे, उपस्थित होते सामन्यावेळी 2 हजार शाळेचे विद्यार्थी हजर होते संपूर्ण सामन्याचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख व्ही जी चोपडे, क्रीडा शिक्षक संदीप पाटील यांनी केले स्पर्धेचे नियोजन क्रीडाशिक्षक प्रदीप साळोखे व व्ही एस पाटील यांनी केले