माळवाडीचा चौफेर विकास करणार : आमदार डॉ. विश्वजीत कदम
माळवाडी येथील विविध विकासकामांचे उद्घाटन ; उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांची उपस्थिती

दर्पण न्यूज भिलवडी माळवाडी :-
माळवाडी येथील विकासकामांच्या भूमिपूजनामुळे ग्रामस्थांना अधिक सुविधा मिळणार आहेत. जनतेचे जीवनमान उंचावणार आहे. विकासकामे करून माळवाडीचा चौफेर विकास करणार, असे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.
माळवाडी ता.पलूस येथील विकासकामांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
खटाव–माळवाडी रस्ता (ग्रा.मा. १९ भाग), माळवाडी गावातील लांबी – १५ लाख, तासगांव रोड ते चव्हाण प्लॉट अंगणवाडीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, झेंडा चौक ते हनुमान मंदिर रस्ता डांबरीकरण –१५ लाख, हनुमान मंदिर येथे सोयी-सुविधा पुरविणे – १० लाख, माळवाडीत नवीन ग्राम सचिवालय इमारत बांधणे – २५ लाख, मशिदी समोरील जागेत काँक्रीटीकरण –३ लाख, बागडी समाज मरीआई मंदिर सभा मंडपावर नवीन स्लॅब टाकणे – ५ लाख, रामोशी समाज अंतर्गत रस्ता व बंदिस्त गटार करणे – २५ लाख असे एकूण १ कोटी ८ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सरपंच अश्विनी साळुंखे, उपसरपंच संपत सोनवले, सर्व ग्रा.पं. सदस्य, संताजी जाधव, कुमार पाटील, विनायक भोळे, महादेव महिंद व कार्यकर्ते उपस्थित होते.



