येडशी येथे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

येडशी : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे १२२ व्या जयंतीच्या निमित्ताने जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येडशी येथे राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच दरम्यान राज्यस्तरीय शालेय स्पर्धाच्या आयोजनही करण्यात आलेले असून त्यासाठी भरघोस बक्षिसे ठेवलेली आहेत.
दिनांक २२ व २३जानेवारी २०२५ रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असून राज्यस्तरीय खुल्या पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक रोख २१००० रुपये व चषक द्वितीय क्रमांकासाठी रोख १५००० रू व चषक तृतीय क्रमांकाचे रोख ११०००रू व चषक तर चतुर्थ क्रमांकासाठी रोख ७०००रू व चषक असे बक्षीसाचे स्वरूप आहे. शालेय गटासाठी १४ वर्ष मुले आणि मुली १७ वर्ष मुले आणि मुली १९वर्ष मुले आणि मुली यांचे गट केलेले असून प्रत्येक गटासाठी रू ७०००,५०००,व ३०००चे बक्षीस व चषक असे स्वरूप आहे.
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच येडशी ग्रामस्थांच्या सहकार्याने या स्पर्धा होणार असून खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था केली असल्याची माहिती प्राचार्य चंद्रकांत नलावडे यांनी दिली. नाव नोंदणी करण्यासाठी ७२४९००५९६३व८६६८५२७५१५या क्रमांकावर संपर्क साधून महाराष्ट्रातील नामांकित संघांनी सहभाग व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.