महाराष्ट्रराजकीय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, दिनांक 23 मे 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 23 मे रोजी दुपारी 1.05 वाजता इचलकरंजी येथून मोटारीने पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्रामबाग, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1.35 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, विश्रामबाग, सांगली येथे आगमन. दुपारी 1.40 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली नवीन प्रशासकीय इमारतीचा व इतर पोलीस उपक्रमांचा लोर्कापण समारंभ. दुपारी 2.10 वाजता सांगली जिल्हा पोलीस आढावा बैठक. दुपारी 2.50 वाजता मोटारीने नक्षत्र हॉल सांगलीकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता नक्षत्र हॉल येथे आगमन व भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सोईनुसार मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.