महाराष्ट्र
मानसिंग को.ऑप बँक लि, दुधोंडी शाखा कराडचा 13 वा वर्धापन दिन उत्साहात
आमदार, दिग्गज मान्यवर, सभासद, हितचिंतकांची उपस्थिती
कराड ; मानसिंग को.ऑप बँक लि, दुधोंडी शाखा कराड या शाखेचा 13 वा वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. 01 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला
सकाळी सत्य नारायण महापूजेचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे कुलगुरू मस्के सर, रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,मानसिंग बँकेचे संस्थापक लोकनेते जे के बापू जाधव, चेअरमन सुधीर भैय्या जाधव, युवा नेते सतीश आबा पाटील, अनिल जाधव, मानसिंग बँकेचे पदाधिकारी,बॅंकेचे सभासद, पत्रकार ,खातेदार, हितचिंतक यांनी कार्यक्रमास उपस्थित होते.