डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर (बुर्ली ) NAAC ची A++ ग्रेड मिळाल्याबद्दल जे. के (बापू ) जाधव, महाविद्यालयाच्या टीमचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्याहस्ते सत्कार
सत्कार प्रसंगी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

पलूस :डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर (बुर्ली ) NAAC ची A++ ग्रेड मिळाल्याबद्दल जे. के (बापू ) जाधव, महाविद्यालयाच्या टीमचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर (बुर्ली ) NAAC ची A++ ग्रेड मिळाल्याबद्दल महाविद्यालय विकास समियीचे सदस्य मा. जे. के (बापू ) जाधव,महाविद्यालयाच्या प्राचार्य. डॉ. यु. व्ही. पाटील, समनव्यक प्रा. दिनेश ससाने यांचा सत्कार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम साहेब, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आमदार विश्वजित कदम व संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र यांच्या च्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख, डॉ. अनिल पाटील साहेब,संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ काका शिंदे, कुलगुरू डॉ ज्ञानदेव म्हस्के,सहसचिव डॉ राजेंद्र मोरे, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य. विठ्ठल शिवणकर साहेब डॉ.रवींद्र पवार,प्राचार्य.डॉ. मोहन राजमाने साहेब, डॉ. एम. बी. शेख साहेब, श्री.विनायक संकपाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.