विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे अमित शहा यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सांगलीत तीव्र आंदोलन

सांगली : भारताला “संविधान” देताना हजारो वर्षाच्या मनुस्मृतीचे राज्य संपवून समता बंधुता अस्पृश्यता निर्मूलन तसेच देशातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना, स्त्रियांना सामाजिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य देणाऱ्या संविधानाची निर्मिती करणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरएसएस व त्याच विचारसरणी मधून तयार झालेले बीजेपी हे नेहमीच द्वेष करत आलेले आहेत. हा द्वेष इतक्या टोकाचा आहे की स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असतानाही त्यांना विरोध करण्यासाठी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती आणि तीच मनोवृत्ती तोच विचार डोक्यात ठेवून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या सभागृहात बाबासाहेबांचा अपमान करण्याच्या हेतूने वक्तव्य केले आहे, खरे तर भाजपला जर संधी मिळाली तर ते संविधान बदलून परत मनुस्मृतीचे राज्य आणण्यास मागेपुढे पाहणार नाहीत आणि म्हणूनच गेले सत्तर वर्षांमध्ये त्यांच्याजवळ सत्तेची ताकद नसल्यामुळे हे लोक गप्प होते आता सत्तेची ताकद मिळाल्याबरोबर त्यांनी अल्पसंख्या, आदिवासी, मागासवर्गीय व स्त्रिया यांच्यावरचे अत्याचार वाढले आहेत आणि या सगळ्या घटना कुठे न कुठे राज्य आश्रयाशिवाय होणे शक्य नाहीत आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी सांगली हे या सर्व मतदारांना ही बाब निदर्शनास आणून देत आहे की तुम्ही दिलेल्या मतांच्या जोरावरती या लोकांची अशा कृती करण्याचे धाडस वाढलेले आहे पण आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी विचाराचे व संविधान मानणारे लोक हा अपमान प्रतिकात्मक घेत असून, सदर घटनेचा आम्ही “जाहीर निषेध” करत आहोत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कोण एक साधारण व्यक्ती नसून ते या देशाचा विचार आहे आणि म्हणून अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घातला नाही तर या देशांमध्ये अराजकता निर्माण होईल त्यासाठी लोकांनी जागृत होऊन याचा विरोध केला पाहिजे असेही आव्हान करत आहोत. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी सांगली च्या वतीने तडीपार गुंड अमित शहा यांनी सर्व भारतीयांची भावना दुखावल्या असल्याने त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करावा तसेच ताबडतोब “गृहमंत्री अमित शाहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाहीर माफी मागावी” अशी मागणी करत आहोत. तसेच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत आणि जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही लढाई चालूच ठेवणार आहे व टप्प्याटप्प्याने तीव्र करत जाणार आहे. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र राज्य शासन तसेच केंद्र शासन जबाबदार राहणार आहे असा इशारा देण्यात आला आहे, आंदोलना मध्ये, वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, विनायक मोरे, परशराम कुदळे, अशोक लोंढे, सुखदेव कांबळे, नितीन सोनवणे, मानतेस कांबळे, अनिल कांबळे, नवीन कुमार कांबळे, प्रमोद मल्लाडे, श्रीकांत ढाले, विशाल कांबळे, मिलिंद कांबळे, रतन तोडकर, अनिल अंकलखोपे, मनोज सनदे, योगेश कुरणे, शंकर सुतार आदीसह फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.