महाराष्ट्र
माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी घेतले भुवनेश्वरी देवीचे दर्शन
लोकनेते जे के बापू जाधव यांचीही उपस्थिती

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी भुवनेश्वरीवाडी येथे माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी नवरात्र उत्सवात सहभागी होऊन भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
माजी सहकार मंत्री स्व पतंगराव कदम साहेब नवरात्र उत्सवात अनेक धार्मिक स्थळांना भेटी देत. आज सोमवारी त्यांचा वारसा जपत माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी भुवनेश्वरीवाडी येथे नवरात्र उत्सवात सहभागी होऊन भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
यावेळी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते जे के बापू जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामदादा पाटील, काँग्रेसचे युवा नेते सुधीर भैय्या जाधव,
भिलवडी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.