भिलवडी येथील इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये वार्षिक बक्षिस वितरण समारंभ उत्साहात

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूल मध्ये दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पलुस,इतिहास विषयाचे प्राध्यापक व नागाव येथे वास्तव्यास असलेले कवी संतोष हणमंत काळे सर उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक वर्षात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले, त्यांचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. प्रमुख पाहुणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना गोष्टीरूप असे अनमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. मानसिंग हाके सर, संस्थेचे संचालक श्री .वठारे सर , संस्थेचे ट्रस्टी ,श्री अशोक चौगुले सर , सेकंडरी स्कूलचे पर्यवेक्षक श्री विनोद सावंत सर, खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुकुमार बाबासो किणीकर सर, तसेच के.जी. विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने उपस्थित होत्या. बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सुग्रास भोजनाचा आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.