ग्रामविकास कॅबिनेट मंत्री, जयकुमार (भाऊ) गोरे यांनी स्वर्गीय डॉ पतंगरावजी कदम यांच्या स्मृतिस्थळ “लोकतीर्थ”ला दिली भेट
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के (बापू) जाधव यांच्या कडून ग्रामविकास मंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांचा सत्कार

पलूस ; *महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित ग्रामविकास आणि पंचायत राज कॅबिनेट मंत्री, मा जयकुमार (भाऊ) गोरे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री पलुस कडेगाव विधानसभेचे दैवत स्वर्गीय डॉ पतंगरावजी कदम (साहेब) यांच्या स्मृतिस्थळावर “लोकतीर्थ” या ठिकाणी भेट देऊन आशीर्वाद घेण्यात आले,
यावेळी सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनरावजी कदम (दादा) , कडेगाव तालुक्याचे नेते शांताराम (बापू) कदम, कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के (बापू) जाधव, मानसिंग को ऑप बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, अंकलखोपचे सतीश (आबा) पाटील, नारायण (बापू) दिवटे, पलुस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष प्रमोद जाधव, अक्षय सावंत, ओंकार दिवटे, दुधोंडी चे भारती शिक्षण संस्थेचे सचिव मिलिंद (साहेब) जाधव, संदीप पाटील व प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पलुस कडेगाव विधानसभा मतदार संघामधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.