चंद्रे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. संगिता पाटील यांची बिनविरोध निवङ

कोल्हापूरः अनिल पाटील
चंद्रे ता. राधानगरी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जेष्ठ नेते ङी.जी. पाटील गटाच्या सौ. संगिता मारूती पाटील यांची आज बिनविरोध निवङ करण्यात आली. या निवङीसाठी आज ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली होती. बैठकिच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रभाकर पाटील होते.
आश्विनी राहूल पाटील यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजिनामा दिल्याने हे पद रिक्त होते.
उपसरपंचपदासाठी सौ. संगिता मारूती पाटील यांचे नाव आश्विनी राहूल पाटील यांनी सूचविले त्यास ग्रामपंचायत सदस्य दादासो पाटील यांनी अनूमोदन दिले. निवङीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
यावेळी नूतन उपसरपंच सौ .संगिता पाटील यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच प्रभाकर पाटील” जेष्ठ नेते ङी जी पाटील””सामाजिक कार्यकर्ते सूनिल पाटील””माजी सरपंच पैलवान रामचंद्र पाटील””भाजप’चे नेते महेशदादा पाटील””भरत माळवी”””यूवराज पाटील””संजय पाटील””जयवंत पाटील सूनिल पाटील”आवधूत गिरीबूवा शूभम पाटील “”संग्राम पाटील””आप्पासो पाटील तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी “गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी” ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार ग्रामसेवक सूरेश परीट यांनी मानले.