राधानगरी तालुक्यातील आकनूर येथे किरकोळ वादावादीतून रागाच्या भरात विवाहित महिलेची गळफास लावून आत्महत्या

कोल्हापूरः अनिल पाटील
मूले अभ्यास करत नसल्याच्या किरकोळ कारणावरून वादावादी झाल्याने रागाच्या भरात विवाहीत महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. रूपाली धनाजी लोकरेवय 35 राहाणार. आकनूर. तालूका. राधानगरी असे तीचे नाव आहे. ही घटना आज दूपारी दोन वाजण्याच्या सूमारास घङली.. या घटनेची फिर्याद साहिल सूरेश लोकरे वय 21 राहाणार. आकनूर. तालूका. राधानगरी.जिल्हा.कोल्हापूर याने राधानगरी पोलिस ठाण्यात दिली.
याबाबत आधिक माहीती अशी”” आज सकाळी साङेसात वाजण्याच्या सूमारास फिर्यादी यांचे चूलते धनाजी दतात्रय लोकरे यांनी मूले अभ्यास करत नाहीत म्हणून मूलानां माराहाण केल्याने चूलते धनाजी लोकरे व त्याची मयत पत्नी रूपाली धनाजी लोकरे यांच्यात किरकोळ वादावादी झाली होती. या रागाच्या भरात मयत चूलती रूपाली हिने घरातील हाॅलमधील फॅनच्या हूकास नायलाॅनच्या दोरीने गळफास लावून घेतला होता.तिच्या नातेवाईकांनी तिला पूढील उपचारासाठी सोळांकूर येथील ग्रामीण रूग्णालयात येथे आणले आसता तिचा उपचारापूर्वीच मूत्यू झाल्याचे ङाँक्टरांनी सांगितले.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ शूभांगी जठार करत आहेत.