महाराष्ट्रराजकीय
तासगाव येथील स्ट्राँग रूमची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून पाहणी

सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी निवडणूक पूर्वतयारी, सुरक्षा आदीच्या अनुषंगाने तासगाव विधानसभा मतदार संघातील तासगाव येथील स्ट्राँगरूम व मतमोजणी कक्षास संयुक्त भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्ट्राँगरूम व मतमोजणी कक्षामध्ये आवश्यक सोयी सुविधा, सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांच्यासह महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.