सार्वजनिक वाचनालय भिलवडीचा साठावा हीरक महोत्सवी वाचन कट्टा उत्साहात
विशेष अतिथी म्हणून चितळे उद्योग समूहाचे संचालक उद्योगपती मकरंद चितळे यांची उपस्थिती

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या वतीने साठावा हीरक महोत्सवी वाचन कट्टा मोठ्या उत्साहात झाला.
या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ संचालक भू. ना.मगदूम सर होते. विशेष अतिथी म्हणून चितळे उद्योग समूहाचे संचालक उद्योगपती मकरंद चितळे उपस्थित होते. प्रथम कार्यवाह व वाचन कट्टा संयोजक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून आज वरच्या वाचन कट्टा उपक्रमांचा आढावा घेतला माझे दिवाळी अंकांचे वाचन हा आजच्या वाचन कट्ट्याचा विषय असल्याचे सांगितले यावेळी हरा जोशी मेजर उत्तम कांबळे डी आर कदम जयंत केळकर सौभाग्यवती उर्मिला डीसले वहिनी महादेव जोशी जयदीप पाटील हनुमंतराव शिंदे रमेश चोपडे प्रमोद कुलकर्णी अभिषेक साळुंखे गजानन माने जी.जी.पाटील गुरुजी यांच्यासह अनेक वाचकांनी वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल आपली मते व्यक्त केली यावेळी मेजर उत्तम कांबळे यांनी त्यांच्या आत्मचरित्राचा तेरावा भाग सादर केला. भालचंद्र केसरी काल निर्णय किशोर मोहिनी अनुभव विजयंत हंस नवरत्न एकता मौज पुणे पोस्ट भन्नाट साधना द इनसाईड या दिवाळी अंकांवर वाचकांनी आपली मते व्यक्त केली. अभिषेक साळुंखे यांनी कविता सादर केल्या.तर कार्यवाहक सुभाष कवडे यांनी यांनी पुणे पोस्ट या दिवाळी अंकातील देवघर ही ग्रंथालयावरती कविता सादर केली. अध्यक्ष श्री भू.ना .मगदूम सर यांनी साधना अंकाचा परिचय करून दिला मकरंद जी चितळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या .या वाचन कट्ट्याचे संयोजन वामन कटीकर विद्या निकम ,मयुरी नलवडे या सेवकांनी केले .हा हिरक महोत्सवी वाचन कट्टा स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या स्मृतीस अभिवादन करून संपन्न करणेत आला पुढील एक जानेवारीचा वाचन कट्टा माझे ललित लेखांचे वाचन या विषयावर होईल असे कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सांगितले डी. आर .कदम सर यांनी आभार मानले.