आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत : सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे

 

 

सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील सन 2024-25 मधील विद्यार्थ्यांचे अर्ज https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून पात्र विद्यार्थ्यांनी दि. 30 नोव्हेंबरअखेर ऑनलाईन अर्ज  करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 13 जून 2018 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन भत्ता रु.25,000/- निवास भत्ता रु.12,000/- तसेच निर्वाह भत्ता रु.6,000/- असे एकूण प्रति विद्यार्थी रक्कम रु 43,000/-इतकी रक्कम तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु.5,000/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु.2,000/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.

लाभ घेण्यासाठी प्रमुख अटी व शर्ती तसेच निकष खालील प्रमाणे-

       सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीतील व हद्दीपासून 05 कि.मी. परिसरातील महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी या योजनेस पात्र आहेत. (या व्यतिरिक्त तालुक्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेशित असणारे विद्यार्थी या योजनेस पात्र नाहीत), विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा. (जात प्रमाणपत्र आवश्यक), विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेश घेण्यास पात्र असावा, दिव्यांग विद्यार्थ्यास (अनु.जाती व नवबौध्द घटकातील) 3% आरक्षण विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक, अधिक्षिका मुलींचे शासकीय वसतिगृह, विश्रामबाग, सांगली फोन नं. 0233-2304367, अधिक्षक मुलांचे शासकीय वसतिगृह, विश्रामबाग, सांगली  फोन. नं. 0233-2301414, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली जुना बुधगांव रोड, सामाजिक न्याय भवन, सांगली फोन नं- 0233-2374739  येथे संपर्क साधावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!