महाराष्ट्रराजकीय
आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी औदुंबर येथे घेतले दत्त महाराजांचे दर्शन
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांची उपस्थिती

भिलवडी
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. डॉ.विश्वजीत कदम यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी बाजी मारली. त्यानिमित्त डॉ विश्वजीत कदम यांनी औदुंबर ता.पलूस येथे गुरूदेव दत्त महाराजांचे दर्शन घेतले.यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम आणि पलूस तालुका काँग्रेस पक्षाचे नेते महेंद्र लाड यांनी दत्त महाराजांची आरती केली. यावेळी अंकलखोप व औदुंबर, भिलवडी ,आदी गावांतील नेते व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी डॉ विश्वजीत कदम यांचे अभिनंदन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांनी आभार मानले. मी नेहमीच तुमच्यासोबत असल्याची ग्वाही आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी दिली.