भिलवडी येथील चितळे महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींची अश्वमेध स्पर्धेसाठी निवड


दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील कुमारी आरती रमेश कांबळे व कुमारी गीतांजली गजानन मोहिते यांची दिनांक चार डिसेंबर ते आठ डिसेंबर २०२५ दरम्यान रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे होणाऱ्या महिला हॉलीबॉल अश्वमेध स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्या भिलवडी शिक्षण संस्थेचे बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून या महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रोफेसर डॉक्टर महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सराव करत असून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे व महाविद्यालयातील कला व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे, उपाध्यक्ष मा. डॉ. बाळासाहेब चोपडे व संस्थेचे सचिव श्री मानसिंग हाके यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे भिलवडी व भिलवडी परिसरामध्ये कौतुक होत आहे



