चिंचणी, कडेपूर येथे डॉ विश्वजीत कदम यांचा प्रचार; भाजप कार्यकर्त्यांचा प्रवेश

पलूस:
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या चिंचणी व कडेपूर (ता. कडेगाव) येथील प्रचाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच यावेळी भाजपच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की मी जनतेसाठी जीवाचे रान करून महापूर आणि कोरोना काळात सेवा केली.पलूस-कडेगावच्या विकासासाठी २० नोव्हेंबरला अ. क्र.१ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतरूपी आशीर्वाद देऊन मला पुन्हा एकदा जनसेवेची संधी द्या. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा वारसा पुढे चालवत असताना मी नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आलो आहे. यापुढेही आपला प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून जनसामान्यांच्या हक्कांसाठी व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम काम करणार हा माझा शब्द आहे.
याप्रसंगी शांतारामबापू कदम, हरी कदम, सतीश आबा पाटील यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.