सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे महिला वाचन कट्टा उत्साहात
उद्योगपती, वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांची उपस्थिती

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे महिला वाचन कट्टा क्रमांक 5 वा मोठ्या उत्साहात झाला.
या वाचन कट्ट्याच्या अध्यक्षा माननीय स्मिता वाळवेकर आणि प्रमुख पाहुण्या म्हणून सरोजिनी गुरव या उपस्थित होत्या यावेळी रानकवी महानोर कवी सुधांशू आणि भिलवडीचे भूषण असलेले कविवर्य माननीय सुभाष कवडे सर यांच्या कविता असा विषय होता वाचन कट्ट्याच्या सखीनी याचे उत्तम सादरीकरण केले वाचन कट्ट्याचे संयोजन प्राजक्ता कुलकर्णी कुंदा वहिनी यांनी केले सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले .
यावेळी सुभाष कवडे सर यांनी त्यांच्या कवितासंग्रहातील कवितेचे उत्तम सादरीकरण केले .कार्यक्रमाचे आभार प्राजक्ता कुलकर्णी (कुंदा वहिनी) यांनी मानले .
यावेळी त्यांनी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांचे विशेष आभार मानले. तसेच वाचनालय वाचन कट्टा सखी वाचनालय सेवक या सर्वांचेही त्यांनी आभार मानले.