दुधोंडीशी घट्ट ऋणानुबंध ; दुधोंडी गावातून माझ्यावर मतांचा पाऊस पडणार : डॉ विश्वजीत कदम
डॉ विश्वजीत कदम यांचे दुधोंडी येथे जोरदार स्वागत ; चौकाचौकात फटाके अन् औक्षण

दुधोंडी:-
दुधोंडी येथे घट्ट ऋणानुबंध नातं आहे . आपल्या आशिर्वादाने दुधोंडी गावातून माझ्यावर मतांचा पाऊस पडणार ,अशा भावना डॉ विश्वजीत कदम यांनी दुधोंडी येथे व्यक्त केले.
यावेळी ग्रामस्थ, माता-भगिनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत करून या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या निवडणुकीच्या प्रचारास दुधोंडी (ता. पलूस) येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी पलूस-कडेगाव मतदारसंघाला आपले कुटुंब मानून आयुष्यभर जनसेवा केली. मतदारसंघाचा चौफेर विकास केला. त्यांचा वारसा पुढे चालवत गेल्या सहा वर्षांत मतदारसंघात बाराशे कोटींचे विविध विकासकामे केली. स्व. पतंगराव कदम साहेबांप्रमाणे मलाही खूप प्रेम दिले. दुधोंडी गावातील ऋणानुबंध घट्ट आहे. दुधोंडी गावचे ज्येष्ठ नेते जे के बापू जाधव यांचे आणि पतंगराव कदम साहेब यांचे नाते जीवाभावाचे होते. सुधीर भैय्या जाधव यांनी ही युवकांच्या माध्यमातून चांगला विकास करण्याचं प्रयत्न केला आहे.पलूस-कडेगाव मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत नंबर वनवर आणण्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला अ. क्र.१ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
यावेळी जे. के. बापू जाधव, युवा नेते सतीश आबा पाटील, यांच्यासह काँग्रेस, महाविकास आघाडी व विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.