क्राईममहाराष्ट्र
राधानगरी तालुक्यातील धामोङ येथे विद्युत तारेचा करंट लागल्याने शेतकर्याचा जागीच मृत्यू

कोल्हापूरः अनिल पाटील
शेतात पेरणी केलेल्या भात पिकास पाणी पाजण्या करीता जात असताना तूळशी नदीच्या पाण्यात मोटारीच्या फूटबाॅलच्या पाईपला करंट लागल्याने एका शेतकर्याचा जागीच मूत्यू झाला. किसन चंद्राप्पा नलवङे ( वय 66) रा. धामोङ ता. राधानगरी असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साङे आकरा वाजण्याच्या सूमारास पङ्याली नावाच्या शेतात घङली. या घटनेमूळे गावावर शोककाळा पसरली आहे.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिपक पाटील अधिक तपास करत आहेत