जनतेच्या भक्कम साथीने निवडून येणार : डॉ विश्वजीत कदम
डॉ विश्वजीत कदम यांच्या मोराळे, आंधळी व सांडगेवाडी येथे भेटी :;ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला : महेंद्र आप्पा लाड यांची उपस्थिती

पलूस:- पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मोराळे, आंधळी व सांडगेवाडी येथे भेट देऊन ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांनी व माता-भगिनींनी अत्यंत उत्साहात स्वागत करून आशीर्वाद दिले.
डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की,जनतेची मिळणारी भक्कम साथ आणि आशीर्वाद मला सदैव बळ देणारे आहेत. या बळावर मतदारसंघात ठिकठिकाणी विविध विकासकामे केली आहेत. तुमची ही साथ आणि पाठिंबा सदैव माझ्या पाठीशी राहू द्या.पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी आपले बहुमूल्य मत मला देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी सांगितले की, डॉक्टर विश्वजीत कदम यांना नेहमीच आपण सहकार्य केले नाही डॉक्टर विश्वजीत कदम यांनी पोलीस कडेगाव पलूस कडेगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आहे दूरदृष्टी नेता म्हणून आज डॉक्टर विश्वजीत कदम यांच्याकडे पाहिले जाते. यामुळे विश्वजीत कदम यांच्याकडे मोठ्या प्रमाणात लोकांच्या मागण्या असतात. पुन्हा एकदा त्यांना आपण 20 नोव्हेंबरच्या मतदानावेळी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन महेंद्र आप्पाला यांनी केले.
यावेळी काँग्रेसचे युवा नेते सतीश आबा पाटील यांनी सांगितले की, स्वर्गीय स्वर्गीय पतंगरावजी कदम यांना नेहमीच जी डी बापू लाड यांनी सहकार्य केले. पतंगराव कदम यांनी नेहमीच गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याचे कार्य केले पलूस कडेगाव मतदार संघातील सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून पतंगराव कदम साहेबांनी विकास केला मतदारसंघातील ग्रामस्थांच्या अडीअडचणींना धावून येण्याचे काम ही साहेबांनी केले या विचाराचा वारसा जपत विधानसभाचे उमेदवार डॉक्टर विश्वजीत कदम ही जोमाने काम करत आहे या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचे भय बाळगण्याचे कारण नाही आत्ता अरुण अण्णा लाड, शरद भाऊ लाड आणि विश्वजीत कदम हे एकत्रित प्रचार करत असल्यामुळे विरोधक घाबरले आहेत म्हणून 20 नोव्हेंबर च्या मतदानावेळी आपण हाताच्या पंजा समोरील बटन दाबून डॉक्टर विश्वजीत कदम यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असेही सतीश पाटील यांनी सांगितले.
शरद भाऊ लाड म्हणाले की डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या नेहमीच लाड कुटुंब पाठिमागे राहिलेला आहे. या विधानसभेमध्ये सर्वच आपण एकत्रित मिळून निवडणूक जोमाने लढायचे आहे कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरण घर वाटून घ्यावे आणि जास्तीत जास्त मताधिक्य डॉक्टर विश्वजीत कदम यांना कसे पडेल याकडे लक्ष दिले पाहिजे असेही शरद भाऊ लाड म्हणाले.
यावेळी महेंद्रअप्पा लाड, शरद लाड , सतीश आबा पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.