अंकलखोप जिल्हा परिषद गटात युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या युवा संवाद घोंगडी बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ विश्वजीत कदम यांना मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार

भिलवडी : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेसच्या वतीने युवा संवाद घोंगडी बैठकांच* आयोजन गावोगावी करण्यात येत आहे.
यानिमित्ताने अंकलखोप जिल्हा परिषद गटातील सूर्यगाव, संतगाव, नागठाणे, अंकलखोप गावात *युवा संवाद घोंगडी बैठक* मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. आ. डॉ. विश्वजीतजी कदम साहेब यांचे *मताधिक्य हे येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक असावं* यासाठी प्रचार करताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकासाची पंचसूत्री लोकांच्या पर्यंत कशा पद्धतीने पोहचवावेत, त्याचबरोबर विश्वजीत कदम साहेब यांचे काम तळागाळात पोहोचवण्याची जबाबदारी युवकांनी घ्यावी तसेच वेगवेगळ्या फसव्या योजना आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणा यांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यावा या सर्व गोष्टींची माहिती या निमित्ताने सर्वांना दिली.
यावेळी पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद जाधव, सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे, विधानसभा महासचिव मंगेश मोटे, प्रसाद शिंदे, अक्षय सावंत, युवक उपाध्यक्ष प्रणालीताई पाटील, गौरव पाटील, सौरभ पाटील, रोनित मोहिते उपस्थित होते