
सांगली : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमिवर भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निकालांचे अंदाज (एक्झिट पोल) दि. १३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७ पासून ते दि. २० नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत या कालावधीत प्रसार माध्यमांवर प्रसारीत करण्यास प्रतिबंधीत केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. या अधिसूचनेचे संबंधितांनी अनुपालन करावे.
तसेच लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 126 (1) (ब) नुसार, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संदर्भात मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेआधी 48 तासांच्या कालावधीत निवडणुकीशी संबंधित मजकूर दाखविण्यास तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणतेही ओपिनियन पोल किंवा निवडणूक संबंधित सर्वेक्षण अंदाज प्रदर्शित करण्यास मनाई असेल, असे भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.