नागठाणे येथे महात्मा गांधी, स्व.बाबासाहेब लांडगे यांना अभिवादन

भिलवडी :- नागठाणे (ता.पलूस) येथे 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती व स्व.बाबासाहेब लांडगे यांची ३२ वी पुण्यतिथी कार्यक्रम जेष्ठ साहित्यिक बाबासाहेब नदाफ, कडेगाव तालुका तहसीलदार अजित शेलार, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, नागठाणे गावचे सरपंच विजय माने, हास्ययात्राकार शरद जाधव, पलूस पंचायत समिती माजी उपसभापती जयकर बापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर नागठाणे येथील पीएसआय पदी निवड झालेले अश्विनी बनसोडे व धीरज जगदाळे यांच्यासह उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरविले गेलेले अभिजीत शिंदे व
नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद जाधव, राजेंद्र बनसोडे यांचा पलूस तालुका बौद्ध सभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, पोलीस पाटील दीपक कराडकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत म्हणाले की, लांडगे कुटुंबीयांच्या सामाजिक योगदानाबद्दल समाधान व्यक्त करून, त्यांनी जपत असलेल्या सामाजिक बांधिलकी बद्दल गौरवोद्गार काढले.दरम्यान बाबासाहेब नदाफ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, शरद जाधव व जयसिंग थोरात यांनी आपली मनोगत व्यक्त केली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष गौस महंमद लांडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकाजी साळुंखे यांनी केले तर आभार यांनी मानले.
यावेळी भिलवडी गावचे तलाठी सोमेश्वर जायभाय, भगवान अडीसरे,बाजीराव मांगलेकर, रणजीत भिसे, महादेव माने, आनंदराव कोरे,राजेंद्र अडीसरे, दिलीप कुलकर्णी, जगन्नाथ थोरात, झुंजार पाटील, सर्जेराव मदने, संपतराव पाटोळे, संपत पाटील, बाबासाहेब मुलाणी, झाकीर लांडगे, इंद्रजीत पाटील, नागनाथ मदने, अल्ताफ लांडगे यांच्यासह नागठाणे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.