जनसेवेसाठी मी सदैव तत्पर, कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे: माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम
कडेगाव शहर व तडसर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात

कडेगांव :
जनसेवेसाठी मी सदैव तत्पर आहे .पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपलीच आहे, असे समजून जोमाने काम करावे, असे आवाहन माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
कडेगाव शहर व तडसर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम बोलत होते.
यावेळी कदम यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात आजवर केलेल्या विकासकामांची माहिती देऊन आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सूचना दिल्या.
आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा कॉग्रेस पक्षाचा विचार आणि स्व. पतंगराव कदम साहेबांचा आदर्श अंगिकारून समर्पित भावनेने जनतेसाठी अहोरात्र काम करत आहे. जनसेवेसाठी मी सदैव तत्पर आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघाला राज्यातील आदर्श मतदारसंघ बनविण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपलीच आहे, असे समजून जोमाने काम करावे, असे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.
यावेळी खासदार मा. विशालदादा पाटील, मा. शांतारामबापू कदम, मा. जितेशभैय्या कदम, इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.