सांगली येथे लोकनेते जे के बापू जाधव, कर्नाटक राज्याचे साखर आयुक्त शिवानंद एच कलकेरी यांच्या हस्ते सी ए उमेश माळी यांच्या नव दालनाचे शानदार उद्घाटन
अत्याधुनिक दालनाच्या उद्घाटनास सी ए सुबोध शहा, विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

सांगली: आपल्या व्यक्तीमत्त्व आणि व्यवसायाशी अत्यंत प्रामाणिक असणारे सी ए उमेश माळी यांच्या नवीन दालनाचे मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक लोकनेते जे के बापू जाधव, कर्नाटक राज्याचे साखर आयुक्त शिवानंद एच कलकेरी , सी ए सुबोध शहा व मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले.
या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी लोकनेते जे के बापू जाधव यांच्याशी सी ए उमेश माळी यांनी बँकींग क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत चर्चा केली.
यावेळी लोकनेते जे के बापू जाधव यांनी माळी आणि सी आर काटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँक शाखा दुधोंडीचे मॅनेजर हनमंत महाडिक, मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेचे विकास कदम, जत चे उद्योजक दीपक पाटील, संग्राम जाधव, पत्रकार अभिजीत रांजणे आणि
विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.